Avyakta Pravasi(Kavy Sangrah), By( Sachin Sangita Kisan Korde)

199.00

“मानवी जीवन हे जणू अथांग पसरलेल्या सागरासारखेच खोलवर आणि तितकेच अनाकलनीय गूढ असते. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनांचे महत्त्वपूर्ण अर्थबोध असतात जे समजून घ्यावे लागतात. जीवन म्हणजे राग, प्रेम, जिव्हाळा,आपुलकी, रुसवा, विरह अशा सगळ्याच संमिश्र भावनांचे समीकरण! काही प्रसंगात आपण आपल्या भावनांशी अतिशय प्रामाणिक असतो, त्यांचे खरे रूप जाणून घेतो; तर कधी इच्छा असूनही या भावना प्रामाणिकपणे व्यक्त करता येत नाहीत. एकंदरीतच आपल्याला प्रत्येक प्रसंगानुसार आणि प्रत्येक भावनेनुसार जुळवून घ्यावं लागतं आणि त्याप्रमाणे प्रसंगी व्यक्त अव्यक्त होणं ठरवावं लागतं. आपलं आयुष्य जरी गूढ असलं, तरीही घडणाऱ्या प्रत्येक घटनांमागे काही महत्त्वपूर्ण अर्थ मात्र नक्कीच दडलेला असतो, जो आपल्याला काळ आणि वेळ दाखवत असते किंवा दर्शवत असते. अशावेळी प्रत्येक व्यक्ती अव्यक्त प्रवासाप्रमाणे आपापल्या भावनांचा ठाव घेत असते आणि त्याप्रमाणे समाजामध्ये प्रतीत होत असते. अशा संमिश्र भावनांची गुंफण आपल्या दर्जेदार साहित्यातून अतिशय सुंदर पद्धतीने लेखणीबद्ध करण्याचा साहित्यिकांचा अट्टाहास ‘अव्यक्त प्रवासी…’ या काव्यसंग्रहात दिसून येतो.

सचिन कोरडे यांनी संकलित व संपादित केलेला शब्दलेखणी प्रकाशनाचा प्रकाशित होत असलेला ‘अव्यक्त प्रवासी…’ हा एक प्रातिनिधिक काव्यसंग्रह आहे. प्रत्येकवेळी नवनवीन विषय, आशय तसेच विविध प्रकारचे विचार व्यक्त करणारे साहित्यिक या सर्वांचा सुगम संगम करण्यामध्ये श्री. सचिन कोरडे कायमच अग्रेसर असतात आणि अशा दर्जेदार उपक्रमांसाठी त्यांचं विशेष कौतुक करणं हे क्रमप्राप्त आहे. नवोदित तसेच दर्जेदार लेखन करणाऱ्या साहित्यिकांना एकत्रित करून रसिकश्रोत्यांना आनंद देणारा आणि विचारविन्मुख करणारा हा काव्यसंग्रह आहे आणि यासाठी मी श्री. सचिन कोरडे यांचे व शब्दलेखणी प्रकाशनाचे मनःपूर्वक अभिनंदन करते.”

  • Publisher ‏ : ‎ Booksclinic Publishing 
  • Language ‏ : ‎ Marathi
  • ISBN-13 ‏ : ‎ 9789355358141
  • Reading Age ‏ : ‎ 3 Years And Up
  • Country Of Origin ‏ : ‎ India
  • Generic Name ‏ : ‎ Book

100 in stock (can be backordered)

SKU: book735BCP Category:

Additional information

Dimensions 5.5 × 8.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.