Hrudayatun Hrudayaparyant, By(Sachin Sangita Kisan Korde)
₹199.00
“हृदयातून हृदयापर्यंत हा काव्यसंग्रह विविध ठिकाणाहून एकत्रित आलेल्या कवींच्या विचारशैलीचा त्यांच्या लेखन शैलीचा व त्यांच्या आत्मबुद्धीचा परिपूर्ण असा काव्यसंग्रह आहे.
हृदयातून हृदयापर्यंत या काव्यसंग्रहामध्ये प्रेमाचे अनेक नाते उलगडलेले आहेत. प्रेम हे कशावरही जडू शकतं याचे सुंदर अशा शब्दांमध्ये यात वर्णन केले आहे.
मी कल्पिलेलं चित्र आज
शब्दलेखणीत प्रकाशित झालं
जीवापलीकडे जपलेलं प्रेम
आज हृदयातून हृदयापर्यंत गेलं.
ज्याप्रमाणे एखाद्या जलाशयात वाऱ्याच्या प्रवाहानेही तरंग उठतात; हे तरंग चौफेर पसरत जातात. असेच अंतर्मनाच्या डोहातून हलकेच उमटणारे हे तरंग म्हणजे सदर पुस्तकातील काव्ये/रचना! हा भावनांचा प्रवाह प्रवृत्त करतो लेखणीला.. मुक्तपणे बागडायला ! परंतु एका परिघापर्यंत जाऊन हे तरंग पूर्णत्वास पोहोचतात व जन्म देतात अनेक नवजात तरंगांना… पुन्हा ते तरंग अंतरंगात रंग उधळतात. अशा तरंगाना योग्य दिशा, वेग देण्याचे कार्य करणारा संयमी परीघ/तट म्हणजे ‘शब्दलेखणी’.
मनामनातील भाव आहे ‘शब्दलेखणी’
अभिव्यक्तीचे गाव आहे ‘शब्दलेखणी’
साहित्य सागरात त्वरे तरुन जाण्या
स्वप्नपूर्तीची नाव आहे ‘शब्दलेखणी'”
- Publisher : Booksclinic Publishing
- Language : Hindi
- ISBN-13 : 9789355358905
- Reading Age : 3 Years And Up
- Country Of Origin : India
- Generic Name : Book
1000 in stock (can be backordered)
Additional information
Dimensions | 5.5 × 8.5 cm |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.