Kavya Hrudayatale : Kavya Sangrah by Vilas Ghodchar

149.00

About book
काव्य ह्रदयातले या कवी स्ंग्रहात सदभावना, रिमझिम पाऊस कोसळतांना, प्रोत्साहन, नवरा असतो, दिल गहाण है, कुटुंब दिवस, पाऊस आणि गुरुजी, बेसिक मध्ये लोचा, कां वंदावे शनेश्वरा, नागझल, कविता पावसाची, आंघोळीची गोळी, टाईम पास याही ऊल्लेखनीय कविता असुन कवीनी मानवी जीवनातील अनेक भाव भावनांचे कंगोरे स्पर्शणार्‍या कविता वाचकांपुढे सादर केलेल्या आहेत. न्याय क्षेत्रात अनेक पिडीतांना योग्य न्याय देणार्‍या तसेच वयाच्या ६७ वर्षाच्या प्रथित यश कवी विलास घोडचरांना मायबाप वाचक प्रचंड प्रतिसाद देऊन योग्य तो न्याय देतीलच.
कवी विलासराव घोडचर पत्नीचे आजारपणाशी संघर्ष सुरु असतांनाच माय मराठीचे संवर्धनार्थ करीत असलेल्या लेखनाच्या निर्मितीसाठी,अभिनव खान्देश कडुन खूप खूप शुभेच्छा!

  • Publisher ‏ : ‎ Booksclinic Publishing 
  • Language ‏ : Marathi
  • Page : 104
  • Size : 5.5×8.5
  • ISBN-13 ‏ : ‎9789358237412
  • Reading Age ‏ : ‎ 3 Years 
  • Country Of Origin ‏ : ‎ India
  • Generic Name ‏ : ‎ Book

1 in stock (can be backordered)

SKU: book012BCP Category:

Description

विदर्भातील यशस्वी चारोळीकार म्हणून नुकतेच ज्यांचे साहित्य क्षेत्रात पदार्पण झाले त्या यवतमाळ निवासी निवृत्त न्यायाधिश विलासराव घोडचर यांच्या जीवनाच्या प्रवासातील अनेक भाव भावनांचे मनात ऊठलेला कल्लोळ म्हणजेच — काव्य ह्रदयातले हा काव्य संग्रह!
विदर्भ, मराठवाडा, खान्देशात न्यायदान क्षेत्रात ३० वर्ष यशस्वी, निष्कलंक सेवेनंतर निवृत्त झाले तरीही आपल्या जीवनातील अनेक प्रसंग, घटना यांनी त्यांच्या मनात खोलवर कुठेतरी घर केले होते. म्हणूनच निवृत्तीनंतर आपल्या वाचनाच्या आवडीच्या बळावर त्यांनी मनातल्या चार ओळी या चारोळी संग्रहानंतर माय मराठीच्या संवंर्धनार्थ वाहिलेला हा काव्य संग्रह ज्याचे नाव – काव्य ह्रदयातले..

Additional information

Dimensions 5.5 × 8.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.