Madhugandha , (Kavya Sangraha ) BY (Mrs. Mansi Santosh Vaidya)

149.00

मधुगंध बद्दल सांगायचे तर यात १०२ कविता आहेत.यात बहुतांश कविता नात्यांवरच्या आढळतील.सुरुवातच होते आईच्या कवितांनी..आणि मग सगळी नाती हळू हळू उलगडू लागतील.अगदी पांडुरंगाला मारलेली हाक सुद्धा..काही कवितांच्या आधी त्या कवितेबद्दल दोन तीन ओळींची प्रस्तावना आहे जेणेकरून कविता कशाबद्दल आहे ते वाचकांना कळेल.हा कवितांचा नजराणा नक्की वाचकांना आपलासा वाटेल.यातली प्रत्येक कविता मी जगले आहे.मला खात्री आहे माझ्या या मधुगंध ला वाचकांचे भरभरून प्रेम मिळेल.

  • Publisher ‏ : ‎ Booksclinic Publishing
  • Language ‏ : Marathi
  • Paperback ‏ : ‎ 119  pages
  • ISBN-13 ‏ : ‎    9789390871209
  • Reading age ‏ : ‎ 3 years and up
  • Country of Origin ‏ : ‎ India
  • Generic Name ‏ : ‎ Book

100 in stock (can be backordered)

SKU: book593BCP Category:

Description

“मी सौ.मानसी संतोष वैद्य,माहेरची मधुमती कित्तूर. मधुगंध हा माझा पहिलाच काव्य संग्रह वाचकांच्या भेटीला येत आहे.आशा करते की तो नक्की रसिक वाचकांच्या पसंतीस उतरेल.माझे आई बाबा बेळगावचे,म्हणजे घरात कन्नड भाषा बोलली जायची,पण माझे शिक्षण मराठी माध्यमातून झाले.अभ्यासाचे आणि माझे फारसे सुत जुळले नाही पण शब्दांशी मात्र खूप घट्ट नाते जमले.मनातल्या भावना शब्दात गुंफायला जमू लागल्या.मी एक समुपदेशक बोलणे आणि ऐकणे हाच माझा प्रांत.त्यामुळे शब्दांशी गट्टी खूप छान जमली.अलंकारिक शब्दांचा सोस नाही किंवा कवितेत यमक जुळावे म्हणून एखादा शब्द बसवायचा असे ही नाही.जसे सुचत जाते तसे उमटत जाते इतकेच….पहिलाच काव्यसंग्रह आहे,काही चूक भूल झाल्यास मोठ्या मनाने पोटात घ्यावी हीच मायबाप रसिक वाचकांना नम्र विनंती.

आपलीच मानसी(मधु)”

Additional information

Dimensions 5.5 × 8.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.