Mat Majhe Vichaar Majhe, By(Anant Dharma Bhoir)

175.00

“मनोगत…..
ज्या ज्या दैनिकानी , मासिकानी आणि दिवाळी अंकानी माझ्या लिखाणाची दखल घेतली त्या सर्व संपादकांचे मनपूर्वक आभार. विशेषतः मुंबई सकाळ आणि माझ्या आगरी समाजातरफे प्रकाशीत होणाऱ्या आदर्श अग्रसेन हया दोन वृत्तपत्रामुळे मला माझे मत आणि विचार मांडण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. कारण जेव्हा जेव्हा मी माझे लिखाण पाठवित असे त्या त्या वेळी ते प्रसिद्ध केलं जात आसे. मग तो जनहितार्थ लेख असो वा राजकीय पक्षांवर / नेत्यांवर केलेली टिका टिपणी असो , माझ्या लिखाणाची नोंद संपादक मंडळीनी घेतली आहे. मला वाचनाची/लिखाणाची तशी सवयच आहे. एखादा लेख, कविता, कथा माझ्या वाचनात आली कि त्यांच्या परस्पर विरोधी किवा तशाच आशयाचलिखाण माझ्याकडून ताबडतोब होत असे.ऊदा।एकनाथ खडसे साहेबांनी म्हटलं होतं कि “” मला मुख्यमंत्री व्हायचय “” त्या त्यांच्या विधानावर मी निरभिडपणे म्हटलं आहे. तसेच एकदा राज ठाकरे साहेब म्हणाले होते कि “” मी निवडणूक लढवणार आहे”” त्यांच्या हया वक्तव्यावर मी लिहिलं आहे “”साहेब, आपण आता निवडणूक लढवून उगाच हशा करुन घेऊ नका, कारण हि वेळ आपण निवडणूक लढविण्याची नाही. आपण फक्त मार्गदर्शक म्हणून रहावे. “” आणि खरच साहेबांनी माझे विचार वाचले कि काय माहित नाही, परंतु राज साहेबांनी आपला विचार बदलविला म्हणजे निवडणूक न लढविण्याचा विचार जाहिर केला आणि त्यावरहि मी ताबडतोब माझं.मत मांडलय कि “” साहेब, आता कसं बोललात “” आणखी सांगायचं म्हणजे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणूकीचा प्रचार चालू असताना एका सभेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणविस साहेब , शिवसेना पक्षप्रमुख ऊद्धवजी ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख आदरणीय राज साहेब _ आपसामधे एकमेकांवर टिका टिपणी करीत असताना फडणविस साहेब म्हणाले होते कि “”घालून हात जबडयात “” त्यावरहि मी टिपणी केली आहे कि “” असं करू नका हो “” “” केडीएमसी निवडणूकिच कवित्त्व “” हया नावाने मुंबई सकाळमध्ये लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याचप्रमाणे आदर्श अग्रसेन मध्ये प्रकाशीत झालेल्या कथा सत्य कथा आहेत असं म्हणायलाहि काही हरकत नाही.तसेच ् सकाळ दैनिकात देखील माझी “” माझे राष्ट्र महान”” ही कविता प्रसिद्ध झालेँई आहे. त्याचप्रमाणे “” जलद टेरेन “” हि कविता ह्यदगत हया प्रतिनिधीक काव्य संग्रहात 1990 साली प्रसिद्ध झाली आहे. त्याचप्रमाणे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी डिजीटल इंडियाची घोषणा केली तेव्हा त्यानाहि “” आजच्या समस्यांच काय ? “” असा प्रश्न विचारण्यात आला आहे.तसेच माझ्या हया “” मत माझे विचार माझे “” हया पुस्तकात प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या आठ कथा “” आदर्श अग्रसेन “” हया दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे लोकप्रभा हया सापताहिक आणि महाराष्ट्र टाईम्स , क्रुषिवल दैनिकानेहि माझ्या लिखिणाची दखल घेतली आहे म्हणून त्यांचेही आभार. अशाप्रकारे नव्या जुन्या कथा, कविता आणि बातम्यांचा हा संग्रह पुस्तक रूपाने प्रसिद्ध करणाऱ्या booksclinic च्या संपादकांचेहि मनपूर्वक आभार.
आपला अनंत

  • Publisher ‏ : ‎ Booksclinic Publishing 
  • Language ‏ : ‎Hindi
  • ISBN-13 ‏ : ‎ 9789355358769
  • Reading Age ‏ : ‎ 3 Years And Up
  • Country Of Origin ‏ : ‎ India
  • Generic Name ‏ : ‎ Book

100 in stock (can be backordered)

SKU: book1584BCP Category:

Description

“मी अनंत धर्मा भोईर , माझा चुलत भाऊ कै. चंद्रकांत हरी भोईर हयाच्या लिखाणामुळे मला लिहिण्याचा, वाचण्याचा छंद लागला आहै हया छंदामुळे मी 1980 पासुन लिहायला लागलो आहे. मी कथा, कविता, भक्तीगीत, भावगीत, गोळणी लावण्या , एकांकीका , नाटक लिहिली आहेत. एक दोन shortfilm साठी पटकथा संवाद देखील लिहिले आहेत. आतापर्यंत माझी तीन नाटकं प्रकाशीत झाली आहे.”” जीवनात हि घडी “” ,हे चौथं नाटक लवकरच प्रकाशीत होईल. नटखट गौळणी हे पुस्तक प्रकाशीत झालं आहे. “” नाती रक्ताची “” हा लघुपटहि लवकरच पुर्ण होणार आहे. अशाप्रकारे.बरच काहि लिहिलेल आहे आणि अजुनहि लिखाण चालु आहे. ढघबडघ .

Additional information

Dimensions 5.2 × 8.2 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.