Parivartanshil Stri, By(Sau. S. A. kasar)

99.00

About The Book

“आधुनिक युगात समाज प्रगत झालेला असला तरी अतिशय घातक अशा समाज विघातक कृत्यांनी समाज पोखरून निघालेला आहे. आपण समाजामध्ये वावरत असताना बलात्कार, गुन्हेगारी व्यसनाधिनता असे अनेक विध्वंसक प्रश्न समाजाला भेडसावत आहेत. याकरिता आपण काही करू शकतो का? असा विचार मनात आला. समाजाला दिशा देण्याकरिता समाज परिवर्तन घडवून आणणे आवश्यक आहे, अशी अंतरात्म्यातून हाक आली. एकदम माझी प्रतिभा जागृत झाली. स्त्री ही समाज निर्मितीचा एक अविभाज्य घटक आहे. समाज परिवर्तनाचं एक अंग आहे. स्त्री जन्मदात्री आहे. ती जन्मापासून आपल्या अपत्यांवर योग्य संस्कार करून, आदर्श नागरिक घडवून समाज परिवर्तन घडवून आणू शकते. असे माझ्या आतील लेखिकेला आंतरिक तळमळीने वाटले. म्हणून ‘परिवर्तनशील स्त्री’ हे पुस्तक लिहावयास घेतलं. हे माझे प्रथम लिखाण आहे.

या पुस्तकामध्ये लेखिकेने आपली वाणी आणि लेखणी, शक्ती आणि भक्ती, यांचे सर्व सामर्थ्य एकवटुन सामाजिक जागृतीचे आणि प्रगतीचे प्रयत्न परोपरीने केलेले आहेत. बोधपर वाड:मयाची परंपरा या देशात प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. ‘परिवर्तनशील स्त्री’ या पुस्तकामधील आईचे संस्कार, आदर्श समाज निर्मिती विविध उदाहरणे व दाखले देवून वाचकांसमोर मांडलेले आहेत. विवेकाच्या बैठकीवर जुन्या नव्या विचारांचा समन्वय पाहून नवी दृष्टी मिळाल्याशिवाय राहणार नाही.

नवभारताच्या निर्मितीत समाजसुधारणेच्या कार्यात स्त्रीचे कार्य अतिशय महत्वाचे आहे. स्त्री ही समाज निर्मितीचा आधार आहे. हे स्वानुभवाने ओळखून अंतरात्म्याच्या प्रेरणेणे व तळमळीने हे पुस्तक लिहलेले आहे.”

Publisher ‏ : ‎ Booksclinic Publishing
Language ‏ : ‎ Hindi
ISBN-13 ‏ : ‎ 9789355358509
Pages No. :  50
Country Of Origin ‏ : ‎ India
Generic Name ‏ : ‎ Book

100 in stock (can be backordered)

SKU: book1065BCP Categories: , , , ,

Additional information

Dimensions 5.5 × 8.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.