Sai, By(Keda Gaikwad)

99.00

“सई’ या पुस्तकाचे प्रकाशन व्हावे हे स्वप्न बाळगून त्यात उत्तमोत्तम काव्यरचून आज कै. केदा त्र्यंबक गायकवाड आपल्यातून गेले अन् मन एकदम खिन्न झाले. पण खऱ्या अर्थांने जर कुणाला सोबत लाभत असेल तर ती कलाकाराला तो कधीच एकटा पडत नाही. तो जरी आपल्यात नसला तरी त्याची कला त्याचे लिखाण मात्र त्याला आजन्म आठवणीत ठेवते. असेच कै. केदा गायकवाड त्यांचा जन्म ७ मे १९५२ रोजी झाला. जन्म गाव, सरस्वतीवाडी (देवळा, नाशिक) शिक्षण बी.ए.बी.एड. शिक्षकी पेशा असलेले नोकरीचे ठिकाण- श्री. नेमिनाथ जैन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय (चांदवड, नाशिक). काव्य निर्मिती, शेरोशायरी, चित्र काढणे, सहली काढणे, प्रवास करणे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे, सुत्रसंचालन करणे तसेच परिपाठ घेणे अशा बऱ्याच कामात रममाण असणारे व ते उत्तमोत्तम पार पाडण्यात गायकवाड सरांना फारच आवडायचे.

‘सई’ या काव्यसंग्रहामध्ये विविध विषय मांडूनी गायकवाड सरांनी आपल्या मनातील भावना, आशय त्यात मांडला आहे. या काव्यसंग्रहामध्ये प्रेम, आपुलकी, संस्कृती, चालीरिती, परंपरा, निसर्ग याचे भाष्य वाचनीय आहे. या काव्यसंग्रहात त्यांचे स्वप्ने व आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन विकसित केलेला आहे.

गेले या सृष्टितूनि
काव्याचे दाखवूनि दर्पण
सई प्रकाशित करुनि
श्रध्दांजली करतो त्यांस अर्पण…

  • Publisher ‏ : ‎ Booksclinic Publishing 
  • Language ‏ : ‎ Marathi
  • ISBN-13 ‏ : ‎ 9789355358950
  • Reading Age ‏ : ‎ 3 Years And Up
  • Country Of Origin ‏ : ‎ India
  • Generic Name ‏ : ‎ Book

100 in stock (can be backordered)

SKU: book001BCP Categories: , , ,

Additional information

Dimensions 5.5 × 8.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.