Sanvaad Manusakicha by Pranjal Wagh

99.00

  • Publisher ‏ : ‎ Booksclinic Publishing 
  • Language ‏ : Marathi
  • Page : 46
  • Size : 5×8
  • ISBN-13 ‏ : ‎9789355358776
  • Reading Age ‏ : ‎ 3 Years 
  • Country Of Origin ‏ : ‎ India
  • Generic Name ‏ : ‎ Book

1 in stock (can be backordered)

SKU: book1578BCP Category:

Description

मी प्रांजल हनुमंतराव वाघ रा. जळगाव महाराष्ट्र मी नुकतीच पदव्युत्तर पदवी प्राप्त करून आता सध्या जॉब करते. मला पुस्तक वाचायला, वेगवेगळे कला आत्मसाद करायला खूप आवडते. कविता किंवा लेख लिहिणे ही त्यातलीच एक कला आहे. फक्त छंद म्हणून लिहावं काहीतरी असं वाटल होत पण एखादी गोष्ट नकळत आपल्यात रुजावी, आपल्याशी जुळावी आणि आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग व्हावी अगदी तसच आहे काहीस.. माझ आणि लेख/कवितेच. लिहिण्याच्या अनुभव हा 2015 पासून आहे म्हणजे 2015 मध्ये मी लिहायला सुरुवात केली तेव्हा तोडक मोडक लिहायची पण पाहिजेत तसं जमायचं नाही आणि तेव्हा मी तेव्हा मी 14 वर्षाची होती. जशी मी लिहत गेली तसं मला अनुभव येत गेला. लिहिताना चुका खूप झाल्या पण मी निराश झाली नाही. मी लिहीत गेले त्या चुकांमधून शिकण्याच्या प्रयत्न केला कुठे काय चुकतंय त्या चुकांमधून मी शिकली आणि त्या चुका मी सुधारल्या सर्वांना मी शेवटी एवढेच सांगेल आपलं कितीही चुकलं तर नाराज होऊ नका लिहीत राहा एक दिवस नक्की असा येईल की तुमचं पण लिखाण संपूर्ण जगासमोर येईल. मी ही एक सामान्यच व्यक्ती आहे तुमच्यासारखी त्यामुळे आपल लिखाण कुणी तरी वाचतय याचा आनंद शब्दात मांडता येणार नाही. मी लिहिलेल पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहचाव्यात हीच इच्छा…. ‘संवाद माणूसकीचा’ हे माझे पहिलेच पुस्तक आहे. ‘संवाद माणूसकीचा’ म्हणजे यांमध्ये अनुभवाचे बोल आहे. या पुस्तकाच्या सहाय्याने मी एक प्रकारे तुमच्या सोबत संवाद साधण्याचा एक छोटा प्रयत्न केला आहे.
आजकालच्या लोकांची विचारपद्धती, वागणूक, आज जगात काय घडतंय, पूर्वी लोक कशी होती… वगैरे हे सर्व काही या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
मला आशा आहे की हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि या पुस्तकातून मी तुमच्यासोबत जो काही संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे त्यातून मला काय म्हणायचे आहे हे नक्की कळेल आणि हे पुस्तक वाचून तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कळवा.

Additional information

Dimensions 5 × 8 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.