Shiv Vandan : Kavya Evam Lekh Sangrah by Anil Tapkir

149.00

भगवान शिवजींवर केलेली काव्यरचना आणि बोधप्रद लेख संकलित पुस्तक “शिववंदना” आपल्या हाती देताना अतिशय आनंद होत आहे. खुप वर्षांचे स्वप्न पुस्तक रुपात पाहताना अपार समाधान मिळत आहे. खरेतर लेखातून काव्यातून बोध करण्या इतका मोठा मी नक्कीच नाही. एक साधाभोळा प्रयत्न आहे. लहानपणापासून शिवभक्ती करत असताना व सदग्रंथ वाचन करताना परमेश्वर कृपेने जे प्राप्त झाले तेच आज काव्य व लेखरुपाने पुस्तकातून उमटले आहे. घराण्याचा माळकरी वारकरी संप्रदायाचा वसा यामुळे मन लहानपणापासून अध्यात्मिक बनले. आणि कधीतरी चौथी पाचवीत असताना शिवभक्तीकडे वळले. जितकी शिवजींवर आस्था भक्ती आहे. तितकीच त्या परब्रह्म पांडूरंगावर आहे. ते दोघे वेगळे कधी भासलीच नाही.

कवी अनिल तापकीर हे वारकरी संप्रदायाचे पाईक आहे. त्यामुळे साहजिकच त्यांच्यावर वारकरी विचारांचा प्रभाव दिसून येतो. संत ज्ञानेश्वर माऊलींनी विषमतेच्या वरवंट्याखाली भरकटलेल्या समाजाला वारीच्या निमित्ताने एकत्र आणले. मानवी मनात उत्पन्न होणाऱ्या षढविकारांवर विवेकाची घोंगडी टाकली, डोळ्यांवर भक्तीच्या चष्मा चढविला, हातात विश्वास आणि श्रद्धेचे टाळ दिले, पायात असलेल्या विषमता व अंधश्रध्देच्या चपला तोडून फेकण्याचे व सद्वविचारांच्या पदपथावर चालण्याचे बळ दिले. गळ्यात निष्काम, निस्वार्थाची तुळशीमाळ दिली, कपाळी समतेचा चंदनी टिळा लावण्याची, मुखातून सतत श्रीविठ्ठलनामाचा घोष करणारा मंत्र व अतुट भक्ती व श्रद्धा ठेवावी अशी विठ्ठल रखुमाईची मूर्ती डोई मिरविण्याची शिकवण दिली.

  • Publisher ‏ : ‎ Booksclinic Publishing 
  • Language ‏ : Marathi
  • Page : 103
  • Size : 5.5×8.5
  • ISBN-13 ‏ : ‎9789358231540
  • Reading Age ‏ : ‎ 3 Years 
  • Country Of Origin ‏ : ‎ India
  • Generic Name ‏ : ‎ Book

1 in stock (can be backordered)

SKU: book014BCP Category:

Additional information

Dimensions 5.5 × 8.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.