Wedech Aahet Sare by (Gopal Krushna Bharsakale )

300.00

“ही कादंबरी संपूर्ण कांल्पणीक आहे, यातिल सर्व पात्र व गांवाची नांवे सर्वच काल्पणीक आहेत. कल्पना असली तरी ती, सत्या पासून वंचित असुच शकत नाही, शेवटी समाजातील ते एक सत्यच असते. जग हे विविधतेन भरलेलं आहे, कित्येक प्रकारच्या आणि अनेक विचारांच्या लोकांनी हे सजलेलं आहे. मणुष्याला चांगले, वाईट अनुभव इथे सतत येतं असतात. तसेच वाईट विचारांच्या लोकांसवेच काही चांगल्या विचाराचे लोकं ही आपण समाजात बघतच असतो.
समाजाच निरीक्षण करतांना, मला असा अनुभव आला की, वाईट विचार आणि वाईट कर्म करणारें लोकं पहातांना आपल्याला ते सुखी वाटतात. मात्र चांगल्या विचारांच्या लोकांच्या नशिबात सहसा खुप खुप कष्ट, दुःख आपल्याला पहायला मिळते. हे व्यक्ती चित्रण रेखाटतांना असाच विचार करुन, मी माझी कल्पना साकार करण्याचा प्रयत्न केला आहे. एक दुःखी व्यक्तीच समाजाला सुखं देवु शकतो, असं मला वाटलं. ज्या मणुष्याच्या जीवणात कुठेच सुखं, समाधान, आनंद फुललां नाही, तो व्यक्ती कसा ईतरांच्या दुःखी जीवणात सुख, समाधान, आनंद फुललंवतो हिच कल्पना ईथे मी मांडली. मला आशा आहे की, वाचकांना ही कादंबरी नक्कीच आवडेल.
धन्यवाद,

  • Publisher ‏ : ‎ Booksclinic Publishing (10 September 2022)
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Paperback ‏ : ‎ 245 pages
  • ISBN-13 ‏ : ‎ 9789355355850
  • Reading age ‏ : ‎ 3 years and up
  • Country of Origin ‏ : ‎ India
  • Generic Name ‏ : ‎ Book

100 in stock (can be backordered)

SKU: book1336BCP Category:

Description

मी गोपाळ ज. भारसाकळे, माझा जन्म 10 फेब्रृवारी 1962 परतवाडा ता. अचलपुर जि. अमरावती (महाराष्ट्र) हे एक सातपुड्याच्या पायथ्यासी असलेले हे गांव, छोटसं शहर म्हटलं तरी चालेल. वडील वन खात्यात नाकेदार म्हणुन नोकरीला होते. मी मुक्त पणे जंगलातुन फिरलो, मला एकांत खुप आवडायचा, दऱ्या, खोऱ्या, नदी नालें पहात फिरायचो. माझ्या आवडी निवडी थोड्या वेगळ्याच होत्या, काही तरी विचार करित गुणगणत राहायचो. यातुनच मला कविता करायचा छंद जडला आणि मग लिहायचा. मी स्वतःच स्वतःला प्रश्न करायचो आणि उत्तरही मीच द्यायचो, मला यात मौज वाटायची, त्यातुनच कल्पना शक्तीला चालना मिळाली.

Additional information

Dimensions 5.2 × 8.2 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.